Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सावरगावतळ येथील गोरक्ष नेहे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

Responsive Ad Here

संगमनेर:-  महसूल दिनानिमित्त संगमनेर उपविभागीय स्तरावरील आदर्श पोलीस पाटील पुरस्कार तालुक्यातील सावरगावतळ येथील पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना संगमनेरचे प्रांत अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
                 संगमनेर येथिल यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे या वर्षीचा १ऑगस्ट रोजी महसूलदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम कोविड १९ च्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक तत्वांचे पालन करून संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमास संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, अकोले तहसीलदार मुकेश कांबळे नायब तहसीलदार सुधीर सातपुते, तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी आदी मान्यवर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                नेहे पाटील यांनी पोलीस पाटील या नात्याने शासनाचा गावपातळीवर दुवा म्हणून सर्व प्रशासकीय कर्तव्य व  जबाबदारीऱ्या उत्कृष्टरित्या पार पाडलेल्या आहेत. शासन व प्रशासनाची प्रतिमा गावपातळीवर उंचावण्यासाठी त्यांनी प्रशासकीय कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत गावपातळीवर स्वतः  पुढाकार घेत अनेक सामाजिक उपक्रमही यशस्वीरित्या राबविले आहेत.
महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे ई पीक नोंदणी प्रकल्प महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून राज्यातील सहा जिल्ह्यातील नऊ तालुक्यात हा पथदर्शी प्रकल्प मागील वर्षी सुरू करण्यात आला आहे. नेहे पाटील यांनी स्वतः रब्बी हंगामातील त्यांच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई पीक नोंदणीचे राज्यातील सर्वोकृष्ट काम केले आहे. याचप्रमाणे गावात महाराजस्व अभियान, महसूल विभागांतर्गत शासन प्रतिनिधी म्हणून विविध जबाबदाऱ्या व उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रशासनास मदत केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुक २०१९ मतदान प्रक्रिया  गावात शांततेत पार पाडली आहे. गावात विविध आरोग्य शिबीर आयोजित केली, पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गावात विक्रमी जलसंधारणाचे काम केले, गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम पूर्ण केले आहे. गावात अवैध दारू विक्रीस प्रतिबंध करणे. गावात तंटामुक्ती अभियान राबविणे याचप्रमाणे कोविड १९ च्या अनुषंगाने गावपातळीवर सर्व शासकीय आदेशांचे व नियमांचे काटेकोर पालन करणे, कोविड परिस्थितीत गावात चोख बंदोबस्त ठेवणे, गावातील गोरगरिब कुटुंबाना मदत करणे, गावात आरोग्य जनजागृती करणे, नागरिकांना आरोग्यविषयक मदत करणे आदी कार्य केले आहे.
यापूर्वीही नेहे पाटील यांना महसूल विभागाचा जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार, दोनदा उपविभागीय स्तरावरील आदर्श पोलीस पाटील पुरस्कार, वनविभागाचा उपविभागीय स्तरावरील उत्कृष्ट सेवा पुरस्कार तसेच राज्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार मिळालेले आहेत.