प्रा. सागर गाडेकर@ग्रामीण प्रतिनिधी 8 ऑगस्ट 2020
अंदरसुल- महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक व येवला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत गौतमी लोकसंचालित साधन केंद्र निफाड, येवला यांच्यामार्फत आज दिनांक 6 ऑगस्ट 2020 कॉलनी येथे उमा पुत्र महिला बचत गट आरणा महिला बचत गट यांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून क्षेत्रीय समन्वयक संदीप बोढरे हे होते. या वेळी महिलांना आर्थिक साक्षरता या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . बचत गटांनी कशाप्रकारे आपल्या आर्थिक बाजू भक्कम केली पाहिजे कुटुंबातील गरजा लक्षात घेऊन त्याचे नियोजन केले पाहिजे, तसेच बचत देखील वाढवली पाहिजे त्याच बरोबर इतर अनावश्यक खर्च देखील टाळला गेला पाहिजे. यावेळी मार्गदर्शन केले तसेच नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शंतनू वक्ते समुदाय संघटक सुषमा विखे यांनीदेखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी उपस्थित महिला बचत गटातील सदस्य तसेच प्रेरक अर्चना शिंदे उपस्थित होते. महिलांनी हाताला सॅनिटायजर व तोंडाला मास्क परिधान केले होते

