अमरावती प्रतिनिधी @ राजू कलाने
अमरावती :-आज दिनांक 1 ऑगस्ट,2020 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती निमित्य अभिवादनपर कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला.
“जग बदल घालूनी घाव..मज सांगून गेले भीमराव..” आपल्या प्रखर लेगनीद्वारे सांगणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती. त्यांना व त्यांच्या विचाराना आज स्मरण करत महापालिकेद्वारे अभिवादन करण्यात आले.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य महापौर चेतन गावंडे यांचे हस्ते अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपमहापौर कुसुम साहु, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, शहर सुधार समिती सभापती अजय सारसकर, नगरसेवक प्रकाश बनसोड, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, कमलेश साहु उपस्थित होते.

