Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

"अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, चे दोन योद्धे "जागतिक आदिवासी दिनी" पुरस्काराने सन्मानित ...!

Responsive Ad Here

योगेश गोसावी  @ नाशिक जिल्हा  प्रतिनिधी

आदिवासी सम्राट वृत्तपत्राने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन केला गौरव. 

पनवेल (प्रतिनिधी) : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले आदिवासी चळवळीचे वृत्तपत्र अशी ज्याची ख्याती आहे ते आदिवासी सम्राट वृतपत्र व चॅनेलने अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या अराजकीय सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आणि श्रमिक पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. महेंद्र तथा अण्णा पंडित. आणि कोकण प्रदेशाध्यक्ष, संतोष चाळके यांनी कोरोना जागतिक साथरोग कालावधीत आपल्या जिवाची पर्वा न करता लॉकडाऊन मध्ये आदिवासी समाज बांधव, गरजू मजुर ज्यांचे हातावर पोट आहे अशा अडचणीत सापडलेल्या लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यापासून ते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय उपाय योजनांची माहिती त्यांचे पर्यंत पोहचविण्याची कामगिरी केली आहे. त्याच सोबत सदर कालावधीत समाजातील पिडीतांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी पिडीतांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. अण्णा पंडीत व संतोष चाळके यांच्या या जिगरबाज कार्याची दखल घेऊन आदिवासी सम्राट या वृत्तपत्राने त्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले आहे.या पुर्वीही अनेक संस्था संघटनांनी अण्णा पंडित व संतोष चाळके यांनी लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. 

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य ही संघटना प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्यात जातीविरहीत समाजसेवेचे कार्य करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते सामाजिक कार्य करीत असुन अनेकांना या पुर्वीही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त महेंद्र तथा अण्णा पंडित यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दलित मित्र तथा आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, आरपीआय नेते अरुण पाठारे,अॅड.दिलीप वाळूंज, शितल साळवी व इतर मान्यवरांच्या हस्ते कोरोना महामारी जनसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अण्णा पंडित व संतोष चाळके यांना अनेक संस्था संघटनांनी पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातुन कौतुक होत असुन त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.