शिवदास सोनोने
जळगाव जामोद तहसील कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सूनगाव येथे दिनांक 28 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद तहसीलदार यांचे मार्गदर्शनानुसार सुनगावचे पटवारी व मंडळ अधिकारी जामोद यांनी सूनगाव येथील दिलीप सुंदरलाल राठी यांचे भाग क्र 2 मधील अकृशक झालेल्या प्लॉटमध्ये अंदाजे वीस ब्रास रेतीचा साठा आढळून आला त्याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडे स्थानिक पटवारी मंडलधिकारी यांनी पंचनामा ची प्रत जळगाव जा तहसील कार्यालय येथे सादर केली आहे परंतु सदर अवैध रेतीसाठ्या बाबत तहसील कार्यालयाकडून दहा ते बारा दिवस झाल्यानंतरही कोणतीच कारवाई केली नाही अशी चर्चा सुरू आहे त्या पंचनाम्यावर गावातील तीन व्यक्तींच्या सह्या असून या प्रकारणाबाबत त्यांना सुद्धा अंधारात ठेवल्या जात आहे
तहसीलदार शिवाजीराव मगर यांना विचारले असता संबंधित रेती साठा करणाऱ्याला नोटीस देण्यात आली आहे संबंधित रेती साठा करणाऱ्या चे उत्तर आलेले नाही संबंधित नोटीस दिलेली असल्यामुळे साठवणूक करणाऱ्या व्यक्तीवर नोटीस चे उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे उत्तर तहसीलदार शिवाजीराव मगर यांनी दिले. रेती साठा करणाऱ्या व्यक्तीवर शासन काय कारवाई करते याकडे सर्व सुनगांव वासियांचे लक्ष लागले आहे.

