Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी वॉरियर्स महिला डॉक्टर्स व नर्सस सोबत केला रक्षाबंधन उत्सव साजरा

Responsive Ad Here

 मुक्ताईनगर : नारळी पौर्णिमा रक्षा बंधन हा सण भावा बहिणीच्या जीवनातील अत्यंत सुवर्ण क्षण आहे .हा सण दरवर्षी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो . परंतु यंदा देशावर कोरोना महामारीचे सावट असल्याने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे . व देशभरातील दळणवळण बंद असल्याने बहिणीला माहेराचे व भावाचे दर्शन दुर्लभ झाले आहे . अशात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत बहीण भावाच्या नात्याचं अतिशय सुंदर उदाहरण त्यांनी तरुणाई व समाजासमोर ठेवले आहे . आमदार पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटर ला भेटी दिली. " कोरोना महामारीचे संकट ओढवल्यापासून ते आजतागायत कर्तव्य बजावणाऱ्या एकूण 30  महिला डॉक्टर्स व नर्स या खऱ्या खुऱ्या कोरोना वॉरियर्स सोबत रक्षा बंधन उत्सव साजरा केला .
आज भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे . मुक्ताईनगरच्या भूमीला संत मुक्ताई व संत ज्ञानेश्वरांच्या अतूट भाऊ बहिनीच्या नात्याची परंपरा आहे . ही परंपरा शिवसेनेच्या वतीने दरवर्षी जोपासली जाते . व या अनुषंगाने संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थीनी सोबत रक्षाबंधन उत्सव साजरा केला जातो .परंतु कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंदच पडलेले असल्याने या विद्यार्थीनींना मनापासून शुभेच्छा देत त्यांनी घरीच सुरक्षित राहावे असा संदेश शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे . दुसरीकडे कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था कामाला लागली आहे . त्यामुळे अनेकांना रक्षाबंधन साजरा करता येणार नाही .त्यातच महिला डॉक्टर्स , नर्सेस सफाई कामगार हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जीवाची पर्वा न करता अहोरात्र  आपली रक्षा करीत आहे . त्यामुळे आपली रक्षा करणाऱ्या बहिनींसोबत यंदाची रक्षा बंधन साजरी करायची असा निश्चय करून आमदार चंद्रकांत पाटील हे उपजिल्हा रुग्णालयात व कोविड केअर सेंटर ला पोहोचताच महिला डॉक्टर्स व नर्सेस यांनी त्यांचे अतिशय आनंदात स्वागत केले .
आमदार पाटील यांच्यावतीने ओवळणीच्या स्वरूपात साडी,चोळी व सॅनेटाईझर ची भेट :
    यावेळी 30 कोरोना वॉरियर्स डॉक्टर्स व नर्सेस भगिनींना ओवळणीच्या स्वरूपात साडी ,चोळी व सॅनेटाईझरची भेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून देण्यात आले .
  प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , ऍड मनोहर खैरनार , उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले,  शहरप्रमुख गणेश टोंगे , गटनेता राजेंद्र हिवराळे , नगरसेवक संतोष मराठे , माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे , पिंटू पाटील , राजेंद्र तळेले, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे , तालुका प्रमुख  पंकज राणे , हरी माळी , स्वप्नील श्रीखंडे, निलेश घुले , हारून शेख , कलिम मणियार , शेख गयास, तानाजी पाटील , स्वीय सहायक प्रवीण चौधरी , संतोष माळी , मनोज मराठे  आदींची उपस्थिती होती .