प्रतिनिधी @ गणेश तडसे
पैलवान गृप महाराष्ट्र राज्य व आदिवासी वाल्मिकलव्य सेना यांच्या सयुक्त विद्यमाने 9आॅगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आज दिनांक 9 आँगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य व आदिवासी वाल्मिकलव्य सेना याच्या सयुक्त विद्यमाने जयमल्हार नगर, देवपूर धुळे येथे यावेळी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,एकलव्य यांचे प्रतिमेचे पूजन पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य खान्देश प्रमुख, पै सनी भाऊ वाडेकर यांचे हस्ते करण्यात आले व आदिवासी वस्ती मधील शाळकरी मुलांना सौ कविता ताई कोळी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख, श्रीमती दिपाली ताई शेलार, सौ संगिता ताई जोशी यांच्या हस्ते वही, सचित्र बालमित्र, पेन, मास्क चे वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित वस्तीतील बांधवांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्व पटवुन देण्यात आले, वस्ती मधील विधवा महिलांना किराणा किट वाटप करण्यात आले व सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

