जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मध्यरात्री पोहोचले पीपीई कीट परिधान करुन कोविड रुग्णालयात...
कोरोना बाधित रुग्णांशी साधला संवाद ; उदगीरात मुक्कामी राहून घेतला कोरोना परिस्थिती चा आढावा.लातूर जिल्हा प्रतिनिधी @ रवि बिजलवाड
उदगीर शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व वाढलेले मृत्यूचे प्रमाण यामुळे परिस्थिती चिंताग्रस्त बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी रविवारी ( दि.२ ) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास येथील शासकीय कोवीड रुग्णालयात अचानक येऊन पीपीई किट परिधान करून कोरोना बाधित रुग्णांच्या कोवीड वाडात पोहोचले. मध्यरात्री सर्व वाडात जाऊन सुमारे दोन तास तेथे उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचार पुस केली.तर जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांनी उदगीर मध्ये मुक्कामी राहून सोमवारी (दि.४) दिवसभर विविध ठिकाणी भेट देत कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली...

