भारतीय जनता पार्टी पुलगाव शहराच्या वतीने आज नायब तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ , 3 महिन्यांचे विजेचे बिल माफ करण्याच्या मागणी करिता आंदोलन करण्यात आले.दुग्ध उत्पादकांच्या हितार्थ गाईच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रूपये अनुदान द्या व दूध दर प्रति लिटर ३० रूपये करा या मागण्या मान्य करण्यासाठी तसेच या महाविकास आघाडीच्या सरकारने दुधाचे भाव पाडून दुध उत्पादकांनाही तोट्यात पाडल्याबद्दल सरकारचा धिक्कार करण्या करीता भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. नतंर नायब तहसीलदार श्री.उल्हासजी राठोड़ व महावितरण चे उपअभियंता श्री.पूरी साहेब यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री श्री.संजयजी गाते,भाजपा शहर अध्यक्ष श्री.नितिनजी बडगे,शहर महामंत्री श्री.आकाशजी दुबे,श्री.राजकुमारजी पनपालिया,मानसिंहजी झांझोटे,गजेंद्रजी गारपिल्लेवार,भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस व नगरसेविका सौ.माधुरिताई इंगळे, श्री.संतोषजी,, चिंटू दुबे तिवारी,भारतजी नागपाल,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.जनाब शकील खान,भाजपा ज्येष्ठ नेते श्री.सुरेशजी सुखीजा,शहर उपाध्यक्ष श्री.मधुकरराव रेवतकर,श्री.रिचर्डजी क्रॉस,प्रितमजी अरोरा,विशालजी धोपाड़े,राहुलजी काळे, शहर सचिव श्री.रतनेशजी दुबे, चिंटू दुबे, अनिलजी लेकुरवाले,कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्री.तुषारजी वाघ,उत्तर भारतीय आघाडीचे शहर अध्यक्ष श्री.राजेशजी गुप्ता,व्यापारी आघाडीचे श्री.सुधीरजी बांगरे, श्री.दिलीपजी देशमुख,श्री.मनोजजी डोल्हारे ,सूरज फुसाटे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, आंदोलना दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्क लावून आंदोलन करण्यात आले.
