Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया

 चितलवाडी येथे राहत्या घरात विवाहिता शुभांगी बाळकृष्ण पवार (वय 30) हिने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर सदर मृतक महिलेचा भाऊ संतोष नरसिंग डाबेराव (वय 36) राहणार मोरगाव दिग्रस जिल्हा बुलढाणा याने हिवरखेड पोलिसात फिर्याद दिली की तिची मृतक बहीण शुभांगी उर्फ सरला बाळकृष्ण पवार हि तिच्या सासरी नांदावयास असताना तिचा पती बाळकृष्ण किसन पवार, सासरा किसन वासुदेव पवार आणि नणंद सौ. भिकाबाई योगेश माळवे हे शुभांगीला मूलबाळ होत नसल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असत. 

      नेहमी मारहाण करीत असत आणि तिला आत्महत्या करीता प्रवृत्त केले म्हणून तिने आत्महत्या केली तिच्या मृत्यूस वरील तिन्ही आरोपी जबाबदार आहेत. अशा स्वरूपाच्या  फिर्यादी वरून हिवरखेड पोलिसांनी उपरोक्त तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 498, 306, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन आरोपींना कारागृहात पाठविले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.