गणेश महाजन@ तालुका प्रतिनिधी
दिनांक २३/१०/२०२० रोजी एरंडोल तालुक्यात पाऊसामुळे खरीप पिकांचे नुकसान होवुन व शेतमालाला हमी भावापेक्षा कमी दर व्यापारां कडुन दिला जात आहे ,त्यामुळे तालुक्यातिल शेतकरी वर्गाचे जगने मुश्किलीचे झाले आहे , भारतात महाराष्ट्रात व इतर राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे पिकांचे नुकसान खुप प्रमाणत झाले आहे, तर त्यांना नुकसान भरपाई मीळावी ज्या शेतकर्यांनि पिकविमा काडला आहे ,त्यांना त्वरित विमा रक्कम मिळावी,तालुका स्तरावर प्रधानमंत्री पिकविमा कार्यालये सुरु करावे ,जेणे करुन शेतकर्याना सोय होईल,
तसेच केंद्र सरकारच्या हमी भावापेक्षा कमी कीमतीने व्यापारी शेतमालाची खरेदी करत आहे तर सरकारने हमीभाव केंद्र तत्काळ सुरु करावे,किसान क्रेडीट कार्ड धारकांना कर्ज लवकरातलवकर उपलब्ध करावे,
राष्ट्रीय आपत्ती घोषीत करुन केंद्र व राज्य सरकारच्या NRDF फंडातुन हेक्टरी ५०००० रुपयांची सरसकट मदत जाहीर करावी, राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे एरंडोल तहसीलदार यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना संरक्षित रक्कम मिळणे सहज पाच मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष विश्र्वास पाटील यांचा संयोजनातुन व एरंडोल तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे व शेतकरी पदकार्यकारनींच्या उपस्थीतित निवेदन देण्यात आले, तरी सरकारणे शेतकर्यांच्या मागण्या प्रशासन स्तरावर संबधीतांना आदेश देण्यात यावा ही विनंती.

