Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पाकिजा पटेल यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Responsive Ad Here

 सतिष बोरसे प्रतिनिधी धरणगाव

पारोळा तालुक्यातील राजवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व महिला शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पाकीजा उस्मान पटेल यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे यासंबंधीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.ईगल फाउंडेशनच्या वतीने कोरोना महामारी च्या कालावधीत तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातून त्यांचीआदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी एकमेव निवड झालेली आहे .यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.विद्यार्थी सुसंस्कृत व संस्कारक्षम  घडविण्यासाठी राजवड शाळेत मूल्यवर्धनाचे धडे दिले जातात .राजवड आदर्श गावाची पुरस्काराची परंपरा त्यांनी कायम राखली आहे.

या यशाबद्दल मा .आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व जिजामाता कृषी भूषण पुष्पलता पाटील नगराध्यक्ष अमळनेर. गटशिक्षणाधिकारी  कविता सुर्वे मॅडम शिक्षणविस्ताराधिकारी सी. एम. चौधरी केंद्रप्रमुख भाईदास पारधी यांनी अभिनंदन केले आहे