Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पावसाने शेतकऱ्यांची पिके जमिनदोस्त

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

आज एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा व एरंडोल या दोन्ही तालुक्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत मा.आबासाहेबांनी दोन्ही तालुक्यांतील कोरोना काळात प्रशासनाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला व प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक मा.आबासाहेबांनी केले. तसेच पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीने नुकत्याच सुरू केलेल्या कापुस विक्रीसाठी नाव नोंदणीला एकही शेतकऱ्यांची गैरसोय होवु नये असे आदेश दोन्ही तालुक्यातील तलाठी यांना दिले. तसेच मागील काळात झालेल्या मुसळधार वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची पिके जमिनदोस्त झाली. त्याबाबतही तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी म्हणुन अधिकाऱ्यांना सुचना केल्या. याबैठकीत प्रांताधिकारी श्री.गोसावी, पारोळा तहसिलदार श्री.गवांदे, एरंडोल तहसिलदार श्रीमती. खेतमाळीस, पारोळा व एरंडोल नायब तहसिलदार, पारोळा व एरंडोल मंडळ अधिकारी, तलाठी, पत्रकार आदी. उपस्थित होते.