Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पंचायत समिती नांदुरा यांच्या वतीने आयोजित महा आवास- ग्रामीण अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उदघाटन

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश एकडे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार श्री. राजेश एकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महा आवास अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना,ग्रामीण  व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, 

     अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना घरे  तसेच अतिक्रमण धारकाचे अतिक्रम नियमाकुल करावे व त्यांनाही घर उपलब्ध करून द्यावे अशा सूचना प्रशासनाला केल्या.

या कार्यशाळेला  तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. भगवानभाऊ धांडे,नांदुरा पंचायत समितीच्या सभापती सौ.सुनीताताई संतोष डीवरे,जिल्हा परिषदचे गटनेते श्री. संतोषराव पाटील,जि.प.सदस्यां सौ.यशोदाताई चोपडे, उपसभापती श्री.गजानन गव्हाळे, पंचायत समिती सदस्य शेख अब्दुल हाफिज प.स सदस्य श्री.वानखेडे,गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, तहसीलदार श्री.समाधान सोनोने, विस्ताराधिकारी श्री.नेमाडे  श्री.नारखेडे,ग्रामसेवक संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री.प्रशांत जामोदे  नांदुरा पंचायत समितीचे कर्मचारी,ग्रामसेवक व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.