लोणार तालुका प्रतिनिधी मो.असलम परवेज
राज्य मार्ग परिवहनच्या प्रवाशांकरिता *अकोला-लोणार-अकोला* ही नवीन दिवसफेरी दिनांक २७ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेली आहे. हि बस अकोला येथून सकाळी ९:०० वाजता लोणार करिता सुटणार असून अकोला-पातुर-मेडशी मालेगाव-डोणगाव-मेहकर सुलतानपुर मार्गे लोणार येथे १२:०० वाजता पोहोचेल. तसेच परत अकोला करिता त्याच मार्गाने लोणार येथून दुपारी १:३० मिनिटांनी निघून अकोला येथे ४:३० वाजता पोहोचेल अशी माहिती प्रवासी सेवा संघटना, लोणारचे अध्यक्ष शेख उस्मान शेख दाऊद यांनी दिली.
![]() |
| File photo |
लोणार या जागतिक पर्यटन स्थळाला पर्यटक देश-विदेशातून भेट देण्याकरिता नेहमीच येत जात असतात. सोबतच लोणार तालुक्यातील विविध भागांमधून प्रवासी महाराष्ट्रभर प्रवास करीत असतात, त्यांची गैरसोय होऊ नये करिता लोणार प्रवासी सेवा संघटना सदैव प्रयत्नार्थ असते. प्रवाशीयांच्या प्रत्येक अडचणी वर नजर ठेवून त्याची दखल घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करून अडचणीचे निराकरण करीत असतात.
तरी प्रवाशांनी रा.प.महामंडळाच्या सदर बससेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती सेवा संघटनेचे सचिव भागवत खरात यांनी केली. सदर बस सुरू केल्याबद्दल संघटनेचे कार्याध्यक्ष सुगनचंद कोचेटा, उपाध्यक्ष अशोक काटकर, सदस्य नितेश नेवरे आणि पदमावत यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
