जामनेर प्रतिनिधी
पृथ्वी वायू अग्नी आकाश आणि जल यांची माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून येत्या काही दिवसात माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शासनाने जामनेर तालुक्यातील पहूर पेठ या गावाची निवड केली असून या अभियानाअंतर्गत नियोजन बैठकीसाठी
जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी ज्योती कावड देवी यांनी आज सकाळी पहूर पेठ ग्रामपंचायत हॉलमध्ये नियोजनाबाबत बैठक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ज्योती कावड देवी यांनी सांगितले की ग्रामपंचायत अंतर्गत माझी वसुंधरा हे निसर्गाशी संबंधित पंचतत्व संदर्भात जन जागृती करावी यासाठी शासनाने पंधराशे गुण निश्चित केले आहे. ये या योजनेवर आपल्या ग्रामपंचायत चांगले काम केल्यास जिल्हा किंवा विभागीय राज्यस्तरीय बक्षिस मिळू शकते.
गावातील प्रत्येक व्यक्तीने माझी वसुंधरा या अभियानात काम करण्याचे आव्हान गट विकास अधिकारी ज्योती कावड देवी यांनी केले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नियोजन बैठकीला पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन आर पाटील ग्राम विस्तार अधिकारी एस जी बैरागी सुनील मोरे ग्रामविस्तार अधिकारी डी पी टेमकर लोकनियुक्त सरपंच नीता पाटील धनगर समाज उत्तर प्रमुख रामेश्वर पाटील पत्रकार गणेश पांढरे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोडपे ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक अंगणवाडी सेविका आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

