प्रदिप रघुते अमरावती
भारताचे पहिले कृषिमंत्री लोकमहर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदगांव खंडेश्वर व विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांचे जन्मगाव नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे जाऊन त्यांच्या पुतळ्याचे पूजन व त्यांना अभिवादन करून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातुन गेल्या तीन वर्षांपासून पॉवर ऑफ मीडिया व विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. मात्र भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणमहर्षि म्हणून जगात विख्यात असलेले नावलौकिक असणार्या व्यक्तिला दिल्या का जात नाही ही खंत.
तसेच नांदगांव खंडेश्वर येथील पापळ या त्यांच्या जन्म गावाला विकासकामां पासून लोकप्रतिनिधींनी वंचित ठेवले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जोपर्यंत भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत नाही तोपर्यंत पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटना व विदर्भ शेतकरी संघर्ष समिती आपले नियमित एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनास भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी करीत राहू असे पॉवर ऑफ मीडिया विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे व विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे छोटू मुंदे यांनी सांगितले आहे. यावेळी पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, तालुका सचिव सागर सव्वालाखे, सदस्य मनोज जैन, प्रशांत झोपाटे, उमेश चौकडे, अनिकेत शिरभाते, नितेश कानबाले, संदेश ढोके, उमेश चव्हाण आदी पत्रकार बंधू सोबत विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे श्रीकांत जुननकर, प्रविण शेटे, वर्ष ताई वानखडे, मनोहर वानखडे, संजय सुरजुसे, सुधाकर डोंगरे, नंदू इंगळे, प्रदीप पावलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
