लोणार प्रतिनिधी शेख, सज्जाद
शहरातील सर्व राष्ट्रीय व पतसंस्था , शेडयुल , सोसायटयाच्या बॅक प्रशासनाने सुरक्षेबाबत सतर्क रहावे अशा प्रकारच्या सुचना लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविद्रं देशमुख यांनी अयाजीत एका बैठकी दरम्यान केले. लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील सर्व बॅक, पंतसंस्था, सोसायटी च्या अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पोलीस स्टेशन बोलावीण्यात आली होती यामध्ये प्रमुख मुददा होता तो म्हणजे सुरक्षा यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यानी कर्मचारी व अधिकारी यांना सांगीतले की बॅक , पतसंस्था प्रशासनाने बॅकेच्या सुरक्षेतेसाठी सि सी टी व्ही कॅमेरे बसववावेत व बॅकेच्या चारही बाजुला विदयुत व्यवस्था व बॅकेच्या समोर दर्शनी भागा सि सी टी व्ही कॅमेरे लवण्यात यावे जेणे करून रस्त्यावरील वाहतुक व वर्दळीत येणारे बॅकेतील ग्राहक दिसतील.
त्याच बरोबर सुरक्षा रक्षकांना योग्य त्या खबररदारीचा सुचना देणे , बॅक परिीसरात कोणी अनोळखी इसम भाडयाने राहत असल्यास त्याची गोपनीय चौकशी करावी व त्या बाबत काही संशय असल्यास त्याबाबतची माहीती पोलीसाना त्वरीत दयावी त्याच बरोबर ए टी एम मध्ये देखरेख करणाऱ्या सूरक्षा रक्षक हा नेहमी कर्तव्यावर हजर असणे आवश्यक आहे त्याच बरोबर बॅक परिसरात नव्याने बांधकाम होत असल्यास त्याची माहीती ठेवणे आवश्यक आहे. तसेच बॅकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणरे कर्मचाऱ्याची संपुर्ण माहीती ठेवणे व त्याचे चारित्र प्रमाणपत्र पडताळुन पाहने आदी बाबीवर बॅक प्रशासनाने लक्ष ठेवावे अशा प्रकारच्या सुचना देशमुख यांनी बॅक कर्मचारी व पदाधिकारी यांना दिल्या यावेळी अनेक बॅकेचे तसेच पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते
यावेळी बॅकेच्या अधिकारी व पतसंस्थेच्या अधिकारी यांनी पोलीस स्टेशन लोणार यांच्या साठी वाहतुकीसाठी उपयोगी पडणारे बॅरीकेट देण्याची तयारी दर्शवली असुन लवकरच बॅक व पतसंस्था लोणार पोलीसाना बॅरेकेट देणार असल्याचे जाहीर केले यामुळे शहरातील वाहतुकीसाठी फार मोठी मदत होणार असल्याची प्रतिक्रीया देशमुख यांनी व्यक्त केल्या वेळी बुलडाणा अर्बन बॅकेचे मॅनेजर गोपाल साळवे, भारतीय स्टेट बॅकेचे तेलंग,मलकापुर अर्बन केडीट सह पतसंस्था चे मॅनेजर महादेव वानखेडे, चिखली अर्बन बॅकेचे अनंता धांडे, लोणार अर्बन बॅकेचे अशोक चौधरी, आदीती बॅकेचे योगेश शिदे आदी बॅकेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
