गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल नगरपालिकेच्या सभापती निवडीबाबत विशेष सभा संपन्न आज दिनांक : -२०/०१/२०२१ रोजी म.जिल्हाधिकारी सो , यांच्या आदेशानुसार म.पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल श्रीमती अर्चना खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली एरंडोल नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवडप्रकिया शांततेत पारपडली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.रमेश मुकुंदसिंग परदेशी व इतर १६ सदस्य बैठकीस हजर होते . तसेच सन्मा , सदस्य ०७ हे गैरहजर होते . श्री.नितीन चैत्राम चौधरी सार्व.बांधकाम सभापती , बानोबी गुलाब बागवान पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती , श्री.योगेश युवराज देवरे , नियोजन व विकास सभापती , सौ.जयश्री नरेंद्र पाटील महिला व बालकल्याण सभापती अशा प्रकारे एकूण ४ सदस्यांनी प्रत्येकी एका समिती सभापती पदाकरिता नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याकडे मुदतीत दाखल केले . प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी म.पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल श्रीमती अर्चना खेतमाळीस यांनी असता सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरविले त्यानंतर माघारी करिता १५ मि . अवधी दिला असता कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने व एका पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने म.पिठासीन अधिकारी यांनी पुढील प्रमाणे समिती सभापती निवड झाल्याचे घोषीत केले .
१ ) श्री.नितीन चैत्राम चौधरी , सार्व.बांधकाम सभापती गुलाब बागवान , पाणी पुरवठा व जलनिस्सारण ३ ) श्री.योगेश युवराज देवर , नियोजन व विकास ४ ) सौ.जयश्री नरेंद्र पाटील , महिला व बालकल्याण नवनिर्वाचित सभापतींचा म.पिठासीन अधिकारी यांनी अभिनंदन केले . तसेच श्री.रमेश मुकुंदसिंग परदेशी , लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी म.पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल श्रीमती अर्चना खेतमाळीस यांचा सत्कार केला .
यावेळेस मनोगत व्यक्त करतांना लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सांगीतले की शहर विकासाकरीता सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेऊन व सर्वांना न्याय देऊन सभापती पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातारणात संपन्न झालेली असून यापूढे देखील कोणताही राजकीय किंवा पक्षीय भेदभाव न ठेवता संपूर्ण शहराचा विकास करण्याकरीता मी कटीबंध्द आहे . सभेच्या कामकाजात म.पिठासीन अधिकारी यांना मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालय अधिक्षक संजय ढमाळ यांनी मदत केली.

