गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल:-येथे आमदार चिमणराव पाटील यांच्यातर्फे पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या हस्ते शहरातील पत्रकारांचा डायरी व पेन देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले व शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील आनंदा चौधरी अतुल महाजन चिंतामण पाटील हे उपस्थित होते हा कार्यक्रम तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडला.
यावेळी सूर्योदय जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरुण माळी यांच्या हस्ते पत्रकारांना दिनदर्शिका वाटप करून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विनायक कुलकर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी एस चौधरी, उपाध्यक्ष उदय पाठक ,पत्रकार संघाचे पदाधिकारी कमर अली सय्यद जावेद मुजावर प्राध्यापक सुधीर शिरसाठ,शैलेश चौधरी नितीन पाटील संजय बागड रोहिदास पाटील पंकज महाजन कैलास महाजन , कुंदन सिंह ठाकुर,राजू ठक्कर , गणेश महाजन ,पिंटू राजपूत ,आदी उपस्थित होते
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बी चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बागळ यांनी केले आभार प्रदर्शन कैलास महाजन यांनी केल तसेच नगरपालिकेतर्फे नगरपालिका शहरातील पत्रकारांचा सत्कार डायरी व पेन देऊन करण्यात आला याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेसी अध्यक्षस्थानी होते
यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते सुद्धा पत्रकारांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले आभार प्रदर्शन आर के पाटील यांनी केले
तसेच शहरातील स्वामी समर्थ केंद्रात डॉक्टर पिंगळे पिता-पुत्र यांच्यातर्फे सालाबादाप्रमाणे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव होते यावेळी उदय पाठक, कमर अली सय्यद, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,प्रमोद पाटील चिलानेकर, जावेद मुजावर पंकज महाजन पत्रकार उपस्थित होते .
वरील सर्व कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टंसिंग चे पालन करत पार पडला.

