गणेश महाजन एरंडोल
एरंडोल:- येथे म्हसावद रस्त्यालगत असलेल्या गिरणा कॉलनीमधील रहिवासी युवक सुरज रामराव पाटील वय अठरा वर्ष याने आपल्या घरात कोणी नसताना सिलींगच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घटना ३१ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दोन दिवसापूर्वीच अंजनी धरणात उडी मारून एकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच. वर्षाच्या सरत्या दिवशी युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
सदर युवक हा इयत्ता बारावी चा विद्यार्थी होता. घटना घडली त्यावेळी घरात कोणी नव्हते. युवकाचा मामा युवकास जेवणासाठी बोलावयास गेला असता. युवकाचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटनेबाबत युवकाचे आजोबा सुकलाल अंकुश पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील लोहार जितेंद्र तायडे हे करीत आहेत.
