Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा नगरीत महिलांची व मुलींची मां जिजाऊ भव्य सायकल रॅली यशस्वीरित्या संपन्न

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

   शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे तसेच नॉनमोटराईज वाहतुकीस प्रोत्साहन मिळावे हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्त्री शक्ती विचार मंच, नांदुरा यांच्या वतीने प्रतिष्ठीत समाजसेविका सौ. सारिका राजेश डागा व सौ विद्या वाणी यांच्या मार्गदर्शनात आज मंगळवार, दि. १२/०१/२०२१ रोजी भव्य महिला सायकल रॅली २०२१ आयोजित करण्यात येऊन ते शहरातील सर्व क्षेत्रातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह यशस्वीपणे संपन्न झाली.

     सदर महिला सायकल रॅलीचे आयोजन हे शहरातील वीर हनुमान मूर्तीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान करण्यात आले होते. पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत असणारी सदर सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी नांदुरा शहर व परिसरातील अनेक महिला, गृहिणी, विविध क्षेत्रातील महिला कर्मचारी, विविध पक्षांच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या, युवा वर्ग, महिला सायकलपटू, तथा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी या सर्वांनी सहभाग घेऊन परिश्रम घेतले.

   या रॅलीमध्ये सौ सारिका राजेश डागा (शहराध्यक्ष भाजप महिला आघाडी) सौ विद्या ताई वाणी (राष्ट्र सेविका समिती नगर कार्यवाहीका) सौ सुमन राकेश मीहानी (नांदुरा अर्बन बँक संचालिका) सौ रेणूताई डागा सौ सिंधूमती राखोडे सौ सारिता ताई बावस्कर (सचिव भाजप महिला आघाडी) सौ स्नेहल भालेराव सौ आरतीताई नवगजे कु सपना ताई मोरे असंख्य महिला व मुली सहभाग घेतला.