Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अभियंता पीडब्ल्यूडी पूर्णा यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री पांडुरंग सखाराम मोरे हे पूर्ण तहसील अंतर्गत आलेगाव कळमुला चांगेफळ या तीन गावासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीचे काम करत होते दिनांक 23/ 12/ 2020 पासून ते दिनांक 04/0 1 /2021 पर्यंत म्हणजे उमेदवाराला माघारीच्या दिवसा पर्यंतची सर्व प्रक्रिया त्यांनी पार पाडली. दिनांक 04 /01 /2021 रोजी माघारीच्या दिवशी काही कारणावरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण हाताळताना महसूल प्रशासनाला अपयश आल्याचे समजते. 

   त्यादिवशी श्री मोरे यांना अस्वस्थ वाटले ते सांगून  ते निघून गेले. परंतु दिनांक 5/ 01/ 2021 रोजी पूर्णा नदीच्या पुलाखाली मोरे यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला निवडणुकीच्या तणावातून व वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. तरी त्यांच्या मृत्यू प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करण्यात यावी. गुन्हेगारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच निवडणुकीचे काम करीत असताना मृत्यू पावलेल्या अधिकाऱ्यास नियमानुसार देण्यात येणारी शासकीय मदत त्यांच्या कुटुंबीयांना मिळावी यासाठी  अर्चना खेतमाळीस माननीय तहसीलदार सो. एरंडोल यांच्याकडे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 एरंडोल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

    उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुरवाडे श्री गवळी श्री पाटील श्री थोरात श्री पंचबुद्धे श्री पराग श्री बागड श्री घुगे श्री बोरसे श्री चौधरी श्री पगारे श्री खाडे श्री पाटील हे उपस्थित होते.