लोणार :- शेख सज्जाद
तालुक्यातील खुरमपुर येथील बस फेरी नियमीत सुरू करण्याची मागणी सरपंच रेश्मा राठोड व सामाजिक कार्यकर्ते समाधान राठोड यांनी आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे कडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
तालुक्यातील खुरमपूर व अजिसपुर या दोन्ही गावातील अंदाजे 70 विद्यार्थी दरोज शिक्षणासाठी लोणार येथे ये-जा करत असतात त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी त्यांच्या शैक्षणिक सुविधा दृष्टिकोनातून खुरमपूर येथून सकाळी सहा वाजता व दुपारी लोणार येथून एक वाजता बस फेरी सोडणे अत्यावश्यक आहे या दोन्ही गावातील गोरगरीब विद्यार्थी दुसऱ्या खाजगी वाहनाने शाळेला जाणे आर्थिक बाजूने परवडत नसल्याने गोरगरिबांची जीवनवाहिनी म्हणून राज्य परिवहन महामंडळाची बस परवडत असल्याने त्यांचे शैक्षणिक भविष्याचा विचार करता सहकार्य करत सदर बस फेरी नियमित सुरू करावे असेही निवेदनात नमूद आहे सदर निवेदनाच्या प्रती बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव मेहकर मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर तहसीलदार लोणार वाहतूक नियंत्रक लोणार सहज संबंधितांना देण्यात आले आहे.
