अभिजीत ठवरे प्रतिनिधी इंदापूर
कृषिश्री. मा. सचिन देशमुख, अंरराष्ट्रीय खेळाडू ( मुख्य समन्वयक तथा प्रदेशाध्यक्ष कृ.प.संघटना क्रीडा विभाग ) यांना मान अभिमान विकास फाउंडेशन,महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार दरवर्षी पै.खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिनां प्रदान केला जातो.मा. सचिन देशमुख हे मुळ माळशिरस जि. सोलापूर येथील आहेत त्यांनी विविध क्रीडा स्पर्धात प्राविण्य पाप्त केले आहे.
प्राविण्य मिळवलेले क्रिडा स्पर्धा
1) शालेय फ्रीस्टाईल (कुस्ती) स्पर्धा तालुकास्तर सुवर्ण जिल्हास्तर सुवर्ण,विभागस्तर रौप्य 2008-09
2) शालेय ग्रीक रोमन (कुस्ती) तालुकास्तर सुवर्ण, जिल्हास्तर कांस्य 2013-14
3) शालेय ज्युदो जिल्हास्तर रौप्य 2013-14
4) विद्यापीठ स्तर ग्रीक रोमन (कुस्ती) स्पर्धा सुवर्ण 2016-17
5) अखिल भारतीय अंतर विश्वविद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हरियाणा 2016-17
सहावा क्रमांक (सहभाग)
6)खल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2016 सुवर्ण
7) खुल्या जिल्हास्तर अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा 2017 सुवर्ण
8) खुल्या राज्य अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा 2017 (सहभाग)
9) खुल्या राज्य अजिंक्यपद बेल्ट रेसिलंग क्रीडा स्पर्धा 2016 सुवर्ण
10) खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद बेल्ट रेसलिंग क्रीडा स्पर्धा 2016 सुवर्ण
11) जागतिक बेल्ट रेसलिंग क्रीडा स्पर्धा 2016 *सहभाग*
12) खुल्या राज्यस्तरीय कुराश अजिंक्यपद स्पर्धा 2018 कांस्य
क्रीडा क्षेत्रातील मिळालेले पुरस्कार
1) मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार 2018
शैक्षणिक कारर्कीद
1) कृषि जैवतंत्रज्ञान पदवी
(डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली)
2) बी.ए. (सामाजीक शास्त्र)
(यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक)
मा.देशमुख यांनी अतिशय कठीण परस्थिती मध्ये क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे . खेळा बरोबर शिक्षणाची अवड असल्याने मा.देशमुख हे उच्च विद्याविभूषित आहेत .
पुरस्कार प्रदान सोहळा
मा.ना.श्री. बाळासाहेब पाटील (पालकमंत्री सातारा तथा सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य)
मा.श्री. प्रभाकर देशमुख (मा.विभागीय आयुक्त महाराष्ट्र राज्य)
मा.श्री.बाळासाहेब लांडगे
(सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद)
हिंदकेसरी मा.श्री. दिनानाथसिंह (आण्णा)
मा.श्री. सर्जेराव (आबा) शिंदे (उपाध्यक्ष,महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद) मा.श्री. हरिष कदम (उपाध्यक्ष भारतीय कुस्ती महासंग) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.यशवंतराव चव्हान स्मृती भवन,कराड दि. 13 फेबु 2021 रोजी संपन्न होणार आहे
