गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष भानूदास नथ्थु आरखे यांना राज्यस्तरीय गुणिजन गौरव क्रीडारत्न पुरस्कार 2020 जाहीर झाला असून हा पुरस्कार मिळाल्याचे अध्यक्ष मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमी तर्फे कळविण्यात आले आहे . भानूदास नथ्थु आरखे यांनी एरंडोल शहरात अनेक कुस्तीगीराना मार्गदर्शन करून काही खेळाडूंना शासकीय नोकरी पर्यन्त पोहचवले तर काही खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळवत आहेत. त्यांच्या या कामगिरीच्या अनुशंगाला बघून राज्यस्तरीय गुणिजन गौरव क्रीडारत्न पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे .
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार सोहळा एरंडोल शहरातच एका छोटे खानी कर्यक्रमात होणार आहे . ते हा पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारणार आहेत असे गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे सचिव अनिल भाऊ मराठे , उपध्यक्ष पंकज दत्तात्रय पाटील , खजिनदार ऋषिकेश भाऊ महाजन यांनी कळविले .
