शारदा चव्हाण प्रतिनिधी औरंगाबाद चीफ ब्युरो
कोरोना संकट कालात उल्लेखनीय कार्य करणार्या 4 महिला आए पि एस अधिकार्यांना,राष्ट्रीय महीला आयोगाने,"कोविड वूमन वाँरियर " हा पुरस्कार देऊन गौरविले.त्यात महाराष्ट्रातील 4 विजेत्यांमध्ये औरंगाबादच्या पो.निरिक्षक मा.मोक्षदा पाटिल यांचा नंबर लागला.हि बाब आम्हा औरंगबादकरांसाठी आणि खास करुन महिला वर्गा साठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
याचे औचित्य साधून त्यांचे अभिनंदन करण्याचे भाग्य लाभले.राष्ट्रवादी फादरबोडी तर्फे हार्दिक अभिनंदन. या प्रसंगी उपस्थित महिला मंडल शहर जिल्हा उपाध्यक्षा -निशा पाटिल,सिमा बचूटे,सचिव-शारदा चव्हाण,पूर्व सरचिटणिस-रेणूका राठोड,मंगल पवार,शर्लिन डाकवे,मालती पाटिल,लिला मगरे,द्वारका बुधवंत,सुनीता चव्हाण,आणि ईतर.
