शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार
दिनांक 15 मार्च 2021 रोजी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नगर परिषद लोणार यांच्या सौजन्याने पर्यावरण पूरक गाडी (E-Bikes) धारकाला सन्मानपत्र व एक एक रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गितम इ- मोर्ट्सचे संचालक सचिन रामदास कापुरे यांचे कडून पर्यावरण पूरक पिशवी भेट देण्यात आली या प्रसंगी लोणार तालुक्यात व बाहेर या बाइक चे 100 उपभोक्ते झाले आहेत असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष श्री साहेबराव पाटोळे हे होते तर नगर परिषद लोणार चे मुख्यधिकारी श्री विठ्ठल केदारे यांनी इ - बाइक चे आपल्या वसुंधरेला असलेले फायदे सांगितले तसेच मी लोणारकर टीम चे संतोष जाधव यांनी संचलन केले.
व इ-बाइक ची माहिती सांगितली व लवकरच लोणार शहरात इ- बाइक चे चार्जिंग स्टेशन पॉईंट चालू करु असें आश्वासन त्यांनी दिले. प्रसंगी नगर परिषद लोणार चे श्री चव्हाण , श्री निचंग, श्री शहा, श्री वाघ व इतर कर्णाचारी होते तसेच पर्यावरण पूरक बाइक चे श्री सदाशिव साबळे सर, विजय गोरे, दिलीप जाधव, मुकुंद बाहेती, महेश बदामे, संतोष थोरवे, गोविंद जायभाये, मनोजकुमार तोष्णीवाल, प्रेमसिंग जाधव, कारभारी शिंगणे, राहुल रा कापुरे, प्रमोद वराडे, शिवशंकर भानापुरे, संजय राठोड, शरद भांदुर्गे, राजु सुरजूशे, अभिलाष जाधव, विठ्ठल बिथरे, संतोष जायभाये संदीप सरकटे, शेख नासेर सर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
