Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भालगाव फाट्यानजीकचा बेकायदेशीर बायोडिझेल पंपाला सील

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

        एरंडोल:-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत पातरखेडा गावासमोर भालगाव फाट्या नजीक असलेल्या अनाधिकृत बायोडिझेल पंपाला शुक्रवारी पुरवठा यंत्रणेतर्फे श्री लावण्याची कारवाई करण्यात आली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जवळपास सहा महिन्यापासून सदर बायो डिझेल पंप अनाधिकृतपणे सुरू होता याबाबत टाकरखेडयासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या

     याबाबत दखल घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना  सदर पंप सील करण्याबाबत सूचना केली होती. जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत प्रांताधिकार्‍यांना निर्देश दिले प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल तहसील कार्यालयात याबाबत सूचना केली. यावरून शुक्रवारी पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंपावर जाऊन पंपाला सील लावले  या अनधिकृत पंपामुळे पातरखेडे गावाला जीवित हानी होण्याचा धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.