जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा येथील शेतमजूर समाधान बाबूलाल चव्हाण या शेतमजुराची दिनांक 24 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरात कोणी नसताना अचानक घराला आग लावून घरातील सर्व संसार प्रयोग वस्तू व घरातील सर्व सामान कपडे पैसे सर्वच अक्षराच्या जळून खाक झाले होते या घटनेची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील यांनी तात्काळ भेट देऊन या कुटुंबाचे सात्वन केले होते त्या घरी कुटुंबाला मदतीचा हात म्हणून आज आपण समाजाचे काही देणे लागतो फुल ना फुलाची पाकळी म्हणून राशन किट व कपडे या साहित्याचे वाटप करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश दादा पांढरे उपतालुकाप्रमुख बाबुराव पाटील जिप गट प्रमुख विलास मांडे युवा सेना प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव रोटवद येथील विश्वास बावस्कर गोलू बोरसे मोहाडीचे पाटील मोरगाव तांडा ग्रामपंचायत सदस्य विश्राम चव्हाण धोंडू चव्हाण ऋषी चव्हाण जगदीश चव्हाण पृथ्वीराज चव्हाण गोरख चव्हाण सुदाम चव्हाण अरविंद चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
