Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कठोर कारवाई करा - धनश्रीताई काटीकर पाटील

Responsive Ad Here

किरण वाघ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

      राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष  धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या नेतृत्वात  सायंदैनिक  मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांचेवर भ्याड हल्ला करणाऱ्या तात्काळ अटक करून तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी   उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

          लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार बांधव आपले कर्तव्य बजावत असताना किंवा समाजात वावरत असताना त्यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सूडबुद्धीने केले जाणारे हल्ले हे अत्यंत निंदनीय बाब असून राष्ट्रीय समाज पक्ष या घटनेचा निषेध करत पत्रकारांना संरक्षण देऊन त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना पत्रकारिता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर येथून दररोज प्रकाशित होणारे सायंदैनिक मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत हे १६ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास आपले वृत्तपत्राचे कार्यालय बंद करून दुध घेण्याकरीता रूपाली डेअरीकडे जात असतांना माता महाकाली नगर परिसरात त्यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला चढवला मद्य प्राशन केले असल्याने काहीही एक न ऐकता अश्लिल शिविगाळ व धक्काबुक्की करून मद्यधुंद अवस्थेत शांतता भंग करणाऱ्य व दादागिरी करण्याचा प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्या बरोबरच त्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

      सदर निवेदनावर धनश्रीताई काटीकर पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष प्रकाश थाटे जिल्हा संघटक करणसिंह शिरसवाल सय्यद ताहेर अल्प आघाडी प्रमोद हिवराळे संतोष वानखेडे शहराध्यक्ष इत्यादी कार्यकर्त्यांच्या साक्षर आहेत.