नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे
ग्रामीण भागात आय.एस. ओ ९००१ : २०१५ गौरवलेले जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात जपत असताना येवल्याच्या एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राला आय.एस. ओ ९००१ : २०१५ चे मानांकन मिळाले आहे. या मानांकनाने गौरविलेले ग्रामीण भागातील व जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे माननीय संचालक रुपेशभाऊ दराडे यांनी मिटिंगमध्ये सांगितले कि, महाविद्यालयात हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी कमवा व शिका योजना, विद्यार्थी दत्तक योजना यासारख्या विविध योजना राबवून प्रवेश दिले जातात.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. एम.पाटील यांनी आवर्जून सांगितले कि, आपल्या महाविद्यलयाला आय.एस. ओ ९००१ : २०१५ चे मानांकन हे तीन वर्षांसाठी म्हणजे २०२१ ते २०२४ या कालावधी पर्यंत मिळाले आहे व ते टिकवण्यासाठी आम्ही आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयन्तशील राहणार आहोत. हे नामांकन देताना कमिटीने प्रामुख्याने महाविद्यलयाच्या काही महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेतल्या आहेत त्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणारी व्हिजनरी मॅनेजमेंट, डेडिकेटेड व उच्चशिक्षित शिक्षकवृंद, डिजिटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय, भव्य सेमिनार हॉल, ग्रीन टॉयलेट, भव्य क्रिडांगण, मुला-मुलींचे वसतिगृह, प्रदूषण मुक्त ग्रीन कॅम्पस या सर्व सुविधाचा गौरव आहे. विदयार्थ्यांच्या गुणवत्ता-वाढीसह रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा, वैयक्तिक मार्गदर्शन, व्हॅल्यू ऍड प्रोग्राम, इंडस्ट्रि प्रायोजित प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल इंप्लांट ट्रैनिंग व विविध सॉफ्टवेअर कोर्सेस शिकविले जातात. नाशिक, मुंबई, पुणे,औरंगाबाद व विविध ठिकाणी इंडस्ट्रियल टूर नियमितपणे महाविदयालयात आयोजित केले जातात. कॉलेजमध्ये वायफाय सुविधा, वॉटर आर ओ प्लांट, सोलर पॅनल, एक्सप्रेस फीडर, जेनरेटर पॉवर बॅकअप, सेंट्रल वर्कशॉप, सुसज्ज कॉम्पुटर लॅब्स, स्वत्रंत बसव्यवस्था, तसेच भव्य-दिव्य असे वाहन तळ आहे. महाविद्यालयाच्या आवारात विविध प्रकारची झाडें आहेत त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे. महाविद्यालयाचे ग्रंथालय हे ग्रामीण भागातील सर्वात मोठे व अद्यावत ग्रंथालय आहे. यातील डिजिटल लायब्ररीमध्ये आय ई ई ई, स्प्रिंजर, ए एस एम ई, स्कोपस इंडेक्सड यांसारखे नामांकित ई-जर्नलस व बारकोड प्रणाली उपलब्ध आहेत.
यामुळे ग्रंथालयाला नॅशनल डिजिटल लायब्ररीचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणेज विद्यार्थीना आणि कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू आहे. विविध शास्त्रज्ञानांच्या छायाचित्रासह व लेटेस्ट ट्रेंड इन टेकनॉलॉजि असलेलेल्या माहितीनी महाविद्यालयाच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. यंत्र अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, संगणक, स्थापत्य, इलेक्ट्रॉनिकस अँड टेलिकमुनिकेशन, एम बी ए या शाखा आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ कमलकिशोर मणियार, प्लेसमेंट समन्व्यक प्रा दिगंबर पवार, प्रा पी पी रोकडे, प्रा के आर कुंभारडे प्रा एस ए कराळे, प्रा ए एस चांदगुडे, प्रा यू ए अन्सारी व ईतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

