Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवखेडे खुर्द येथील अंगणवाडी मदतनीस कोरोना मुळे मृत्यू

Responsive Ad Here

प्रतिनिधी एरंडोल गणेश महाजन

     एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथील रहिवाशी अंगणवाडी मदतनीस कल्पना बाई विजय सिंग पाटील (वय ५६) यांचे ९ मार्च २०२१ मंगळवार रोजी कोरोना मुळे मृत्यु झाला.

       कल्पना बाई विजय सिंग पाटील यांचा रॅपिड अँटीजीन टेस्ट चा अहवाल निगेटिव्ह आला होता.मात्र ऑक्सीजन लेव्हल कमी असल्यामुळे त्यांना अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाऊंडेशन यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.सिटी स्कॅन अहवालात त्यांना ८० टक्के निमोनिया असल्याचे निदर्शनास आले. दि.७ मार्च २०२१ रविवार रोजी त्यांचा R.T.P.C.R. चा अहवाल पॉझीटिव्ह आला होता.मंगळवार दि.९ मार्च २०२१ रोजी ९ वाजेला त्यांचा कोरोना मुळे मृत्यु झाला.

     त्या जवखेडे खुर्द येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगी,जावई व नातवंडे असा परिवार आहे.