Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

फेसबुक वरून धनगर समाजाची व आमदार गोपीचंद पडळकर यांची बदनामी केल्याप्रकरणी बारामतीत पोलिसात तक्रार

Responsive Ad Here

   प्रतिनिधी 

बारामती:-   शशांक तुकाराम मराठे याने  प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई महाराष्ट्र शशा मराठे या फेसबुक  नावाने फेसबुक अकाउंट वरून धनगर समाजाची व बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या वरती अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्चील लिखाण केले आहे त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अश्या विकृतिकडून नेहमीच महापुरुष व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत असतात अशा विकृत बुध्दीच्या लोकांवर कडक


                 कारवाई झाली पाहिजे, शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात  हे अतिशय दुर्दैवी आहे असे निवेदन आज बारामती शहर पोलिस स्टेशन चे निरीक्षक यांना निवेदन दिले. तसे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ही निवेदन पाठवणार असल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी तक्रार दिली. यावेळी बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे, वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत.