Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिंगणी बु येथील टरबूजची परराज्यात विक्री

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया

          तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बु येथील प्रगतीशील शेतकरी तथा गावाचे उपसरपंच सचिन कोरडे यांनि टरबूज पिकाची लागवड करून अत्यंत गुणवत्तापूर्व व विक्रमी उत्पादन घेण्यास सुरवात केली. त्यामुळे दिल्ली येथील व्यापाऱ्यांनी कोरडे यांच्या शेतातील माल ट्रकद्वारे दिल्ली, पटना येथील मंडईला पाठविला. मात्र विविध राज्यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन पुन्हा सुरु झाले आणि व्यापारीवर्गाकडून चांगल्या प्रतीच्या शेतमालास लॉकडाऊन चे कारण देऊन खूप  कमी भावात खरेदी करण्याची मानसिकता दाखविली.

     अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे नुकसान टाळावे याच उद्देशाने तालुका कृषि विभाग तेल्हारा यांच्या सौजण्याने सचिन कोरडे यांनी स्वतः च्या शेतातील टरबूज कोणत्याही व्यापाऱ्यांना न देता त्याची विक्री थेट परराज्यातील मार्केट मध्ये करण्याचे ठरविले आणि स्वतःच्या शेतातील टरबूज परराज्यात चांगल्या भावात विकले सुद्धा. दिनांक 24/4/2021 रोजी त्यांच्या शेतातील एकूण 50 टन माल परराज्यात पाठविला याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी मिलिंद वानखेडे, मंडळ कृषि अधिकारी गौरव राऊत कृषि पर्यवेक्षक गजानन नागे आणि कृषि सहाय्यक पी टी तिवाले यांची उपस्थिती होती.