Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यपालांनी केले कोरोना योद्धा विकी खोकरेचे कौतुक

Responsive Ad Here

गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल

      एरंडोल - कोरोना काळात कोरोना रूग्णांना आपल्या स्वतःच्या अॅम्बुलन्सने हाॅस्पिटलमध्ये पोहोचवून त्यांची सेवा करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने केवळ कोरोना योद्धाच नव्हे तर रूग्णांसाठी देवदूत म्हणून धावून जाणाऱ्या युवराज फकीरा खोकरे म्हणजेच विक्की खोकरे या एरंडोलच्या तरूण पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्याला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.


   विक्की खोकरे या तरूणाने रुग्णसेवा हीच समाजसेवा हे ब्रीद स्वीकारून रात्रंदिवस मोलाची मदत करत हाॅस्पिटलमध्ये रूग्णांना पोहोचविण्याचे व्रत स्वीकारलेले आहे.या कोरोना काळात स्वतःची मुलं आपल्या आई वडिलांजवळ जायला घाबरतात, नातलग वाळीत टाकतात, अशावेळी विक्की त्या रूग्णाचा श्रावणबाळ होतो तर कधी पालनहार होतो आणि त्या रूग्णासाठी हाॅस्पिटलशी संपर्क साधून बेड मिळवून देण्यापासून ते बरा होईपर्यंत सेवा देण्याचं काम तो अव्याहत करतो आहे. सर्वसामान्य, गरीब रूग्णांनी दिलेला आशीर्वादरुपी दूवा हीच त्याची ऊर्जा तो मानतो. या काळात तो दोनदा कोरोना पॉझिटीव्ह झाला तरी कोरोनावर मात करून त्याने आपली रूग्णसेवा सुरुच ठेवली आहे. याचीच दखल घेत महामहिम राज्यपालांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याच्या कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.