Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

त्या अपघातातील आरोपी आणि वाहन मोकाटच

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी:-जीतेश कारीया


हिवरखेड पोलीस तपासाबाबत उदासीन असल्याचे चित्र

             मॉर्निंग वाक ला जाणाऱ्या निष्पाप नागरिकांना चिरडून पसार झालेले वाहन आणि गंभीर जखमींना तसेच सोडून पसार होणारा तो संवेदनाहीन आरोपी अजूनही पोलिसांना गवसला नसल्याने त्या अपघाताच्या तपासाबाबत हिवरखेड पोलीस उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.दिनांक 5 एप्रिल सोमवार रोजी मॉर्निंग वाकला जाणाऱ्या निष्पाप नागरिकांना एका अज्ञात वाहनाने चिरडले होते. ज्यामध्ये कु. उषा जयराम गिऱ्हे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर सौ वर्षा वसानी, सचिन वसानी, सौ वर्षा भुडके इत्यादी गंभीर जखमी झाले होते. ही घटना सकाळी साडे पाच च्या दरम्यानची असून  निष्पाप नागरिकांना चिरडल्या नंतर गंभीर जखमींना मदत करण्याऐवजी सदर संवेदनाहीन वाहन चालक वाहनासह तेथून सुसाट वेगाने निघून गेला. आपण पकडले जाऊ नये यासाठी सदर व्यक्तीने अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन सोनाळा च्या दिशेने पळविले सोनाळा येथे पहाटे रस्त्यानजीक फिरणाऱ्या 6 युवकांपैकी सामाजिक कार्यकर्ते ललित सावळे आणि प्रशांत येटे या दोन युवकांना सुद्धा या वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.  वेळीच सतर्कता पाळत या युवकांनी मोठी उडी मारून आपला जीव कसातरी वाचविला. ह्या गडबडीत ते गाडीचा सिरीज सह पूर्ण क्रमांक पाहू शकला नाही. परंतु गाडीच्या चारपैकी सुरुवातीचे दोन क्रमांक 69 असल्याचा आणि ती गाडी इनोव्हा कार असल्याची विश्वसनीय खात्री असल्याचा दावा सुद्धा या युवकाने खासगीत बोलताना केला आहे. या घटनेतील गंभीर जखमी  व्यक्तींच्या सांगण्यानुसार आणि काही अत्यंत जागरूक नागरिकांनी टूनकी येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चित्रानुसार हा सर्व घटनाक्रम आणि मिळालेली माहिती जवळपास तंतोतंत जुळत असल्याचे बोलले जाते.  

            हिवरखेड येथील अपघात 5 एप्रिल सोमवार रोजी सकाळी साडे पाच च्या दरम्यान झाला. सोनाळा येथे 5 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान त्याने दोन युवकांना उडविण्याचा प्रयत्न केला असून ठीक 5 वाजून 51 मिनिटांनी एक इनोव्हा सदृश्य गाडी भरधाव वेगाने जाताना टूनकी येथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत आहे. ही चित्रे आणि सर्व माहिती जागरूक नागरिकांनी हिवरखेड पोलिसांना प्रदान केली. सीसीटीव्ही कॅमेरात गाडीचा क्रमांक दिसत नसला तरी सोनाळा येथील प्रत्यक्षदर्शी च्या सांगण्यानुसार हिवरखेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेळीच योग्य दिशेने फिरविली तर लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावू शकतो. आणि आरोपीला त्या वाहनासकट जेरबंद केल्या जाऊ शकते असे सुजाण नागरिकांचे मत आहे.




              टूनकी येथील सीसीटीव्हीत कैद झालेली हीच ती संशयित इनोव्हा कार असल्याचे बोलले जाते.

प्रतिक्रिया

     हिवरखेड येथे अनेक जणांना चिरडल्या वर सोनाळा येथे आम्हाला सुद्धा उडविण्याचा प्रयत्न त्या इनोव्हा चालकाने केला. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्याला जेरबंद करावे. - ललित सावळे, ग्रामपंचायत सदस्य, सोनाळा, जिल्हा बुलढाणा.

     सीसीटीवी फुटेज चेक केले. ती गाडी सौंदळा रोडने गेली आहे. आम्ही दानापुरला विचारणा केली. परंतु माहिती मिळाली नाही. पुढील तपासासाठी विशेष पथक  नेमण्यात येईल. - धिरज चव्हाण ठाणेदार हिवरखेड.