संदीप मस्के प्रतिनिधी देऊळगावराजा
दिनांक. 30 मार्च,2021 रोजी, बदलापूर मुंबई, आंबेडकर चौक, क्रांती पोलीस, कॉलनी, येथील, गणेश हॉल, या ठिकाणी, आंतरजातीय, दिव्यांग विवाह सोहळा संपन्न झाला.
दिव्यांग वधू वर सुचक, सोमनाथ भोसले वेळापूर, प्रदीप कामठे, अपंग जनता दल प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, विद्याताई कारंडे, प्रहार अपंग क्रांती संघटना महिला तालुकाध्यक्ष पाटण, अनिल आसबे, प्रहार जनशक्ती पक्ष, जिल्हा समन्वयक सोलापूर, अलकाताई निकम, मुंबई बदलापूर, समाजसेविका, रजनीताई फुले, अन्नदात्या, यांच्या सहकार्यातून, हा विवाह सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी, पल्लवीताई गुजर, संध्या प्रजापती, प्रमोद पत्रकार, राजू बामणे, संस्थापक अध्यक्ष, S. E. O., सुनील तावरे. प्रहार अपंग क्रांती संघटना तालुकाध्यक्ष, खटाव,अश्विनी फुले, सचिन सावर्डेकर, बदलापूर,यांच्यासह अनेक कार्यकर्ते, उपस्थित होते,बदलापूर पोलीस स्टेशन,यांच्या पूर्व परवानगीने , कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे विशेष,, वधू-वर यांनी, व्हिडिओ कॉल वरती, पसंतीचा कार्यक्रम निश्चित करून, पहिल्या भेटीमध्ये, विवाह सोहळा, संपन्न झाला. वर चिरंजीव, बबन पवार, मुक्काम पोस्ट, चोराडे, तालुका खटाव जिल्हा सातारा, हा 80 टक्के दिव्यांग असून, वधू हीशंभर टक्के दिव्यांग आहे. दोघांनीही एकमेकांना, आहे या स्थितीमध्ये, स्वीकार करून, पुढील आयुष्य, एकमेकाच्या साथीने, जगण्याचा, आणि संघर्ष करण्याचा निर्णय, त्यांच्या परिवारा च्या, परवानगीने, संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यासाठी, covid-19 मुळे, आमचे अनेक दिव्यांग बंधू, ग्रुप ॲडमिन, पदाधिकारी, विविध संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष, व पदाधिकारी, यांनी, फोन वरती वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. माननीय, बच्चुभाऊ कडू साहेब, राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय रामदास खोत साहेब, माननीय गौरव जाधव, पी, ए.राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू साहेब. यांनी फोनवरती, वधूवरांना शुभ आशीर्वाद, दिले.
वरील घटनेप्रमाणे, आपल्या ग्रुप मधील, दिव्यांग मुला-मुलींनी, एकमेकाच्या समस्या व अडचणी, समजून घेऊन, जातीचा व धर्माचा विचार न करता, आपल्याला आहे या परिस्थितीमध्ये, स्वीकारणारा जोडीदार निवडावा. प्रत्येकाच्या कास्टमध्ये, आपल्याला हवा तसा जोडीदार मिळणे, कठीण आहे. एक तर चांगल्या मुला मुलींचे विवाह, होणेही अवघड आहे, त्या परिस्थितीमध्ये, आपण दिव्यांग लोकांचे विवाह, करतो, ही फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे आव्हान, मी दिव्यांग वधू वर सुचक, सोमनाथ भोसले, आपल्या सर्व बंधू भगिनींना करू इच्छितो. पालक लोकांनीही, वेळेवरती निर्णय घेऊन, आपल्या मुला-मुलींना, जोडीदार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता, विविध प्रकारच्या दाते यांच्या माध्यमातून, दिव्यांग मुला-मुलींचे विवाह करून देत आहोत याचा सर्वांनी, लाभ घ्यावा ही नम्र विनंती. वरील वधू वरास, सर्व ग्रुप तर्फे, पुन्हा एकदा, विवाह सोहळ्याच्या, हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
