गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल
सद्यस्थितीत कोरोना पश्चात रुग्णाना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्यानंतर घरी अल्प प्रमाणात ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे . त्याचप्रमाणे हॉस्पिटल मध्ये लगेचच ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यास अडचण हि येत आहे अश्या परिस्थितीत कमी प्रमाणात ऑक्सिजन पुरविण्याचे काम ही मशीन करते . इलेक्ट्रिक सप्लाय च्या माध्यमाने हे मशीन काम करते . बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर ची गरज पडत नसल्यामुळे त्याचा खर्च हि वाचतो . ह्या मशिनपोटी कुठलेही भाडे सुखकर्ता फाउंडेशन कडून आकारले जाणार नसून फक्त अनामत रक्कम म्हणून रुपये अडीचशे व मान . नगराध्यक्ष , नगरसेवक किंवा डॉक्टर्स ह्यांचे रुग्णाच्या आधारकार्डवर परिचयाचे शिफारस पत्र अथवा स्वाक्षरी आवश्यक आहे .
दिनांक ११ एप्रिल रोजी नचिकेत इमेजिंग सेंटर , एरंडोल येथे ह्या मशीनचे लोकापर्ण गेल्या वर्षांपासून कोरोना काळात अखंड सेवेत कार्यरत असलेले श्री . राहुल शिंदे , सिटी स्कॅन टेक्नीशियन ह्यांच्या हस्ते आणि पवन गवळी , वासिम शेख , समीर खान , मंगला पाटील , वैष्णवी पाटील , किसन गवळी व श्री . शेखर बुंदेले ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले . आजपासूनच ह्या ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर मशीन सुविधेचा लाभ एरंडोल शहरातील एका कोरोना रुग्णाने घेण्यास सुरुवात केली आहे .
ज्या रुग्णाला ह्या मशीनची आवश्यकता भासणार आहे व असा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्यास ह्या मशीनच्या उपलब्धतेविषयी जवळच्या नातेवाईकांनी श्री . राहुल शिंदे ( ९६३७९२९१९६ ) ह्यांचेशी सकाळी १० ते ५ ह्या वेळेत संपर्क करावा असे आवाहन सुखकर्ता फाउंडेशन च्या डॉ गीतांजली ठाकूर व जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ नरेंद्र ठाकूर , श्री . शेखर बुंदेले ह्यांनी केले आहे .
