प्रदीप रघु द प्रतिनिधी अमरावती
मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली या बैठकिमध्ये तालुक्यातील सर्वच गावातील पानि टंचाई बाबत समस्या जाणून घेऊन ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे त्या गावातील विहीर अधिग्रहण करून गावातील पाणी समस्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
प्रत्येक वर्षी अधिग्रहनाच्या भरवशावर न बसता कायमस्वरूपी सोर्स निर्माण करणे गरजेचे असून जल जीवन मिशन अंतर्गत टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव सादर करून कायमस्वरूपी सोर्स निर्माण करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, पंचायत समिती उपसभापती नवलेताई, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नरेंद्र जीचकर, वरुड तहसीलदार किशोर गावंडे, मोर्शी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी पवार साहेब,वरुड गट विकास अधिकारी कनाटे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता देशमुख साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यासह विविध गावातील ग्रामसेवक, संबंधित विभागाचे अधिकारी मंडळी उपस्थित होती.
