जामनेर प्रतिनिधी
गटारी अस्वच्छता आणि अनधिकृत नळ कनेक्शन या समस्या बाबत शिवसेनेने दिले निवेदन
जामनेर तालुक्यातील पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतचे गावाकडे समस्या विकासाबाबत दुर्लक्ष होत आहे जगात तो राज्यात व देशात कोरणा सारख्या महामारी मुळे जनता त्रस्त असताना ऐन उन्हाळ्यात पाणीसाठा मुबलक असताना गावाला प्रत्येक भागाला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तसेच गावातील गटारी तुडुंब भरत असून गटारी सुद्धा काढला जात नसल्यामुळे तसेच गावातील बऱ्याच ठिकाणी मेन पाईप लाईन वर आणि नळ कनेक्शन असल्याने गावातील काही भागाला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही यासंदर्भात आज ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये शिवसेनेतर्फे तसेच वार्डातील ग्रामस्थांतर्फे पाणीपुरवठा तसेच गटारी आणि मेन लाईन वर असलेले नळ कनेक्शन यासंदर्भात निवेदन सादर करण्यात
आले याप्रसंगी सरपंच पती रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम साबळे माजी सरपंच प्रदीप लोढा माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनावर शिवसेनेचे व पत्रकार गणेश पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील माजी उपसरपंच ईका पैलवान शेख जुबेर शेख युनूस कलीम शहा आसिफ बिस्मिल्ला शब्बीर भाई दिलीप भाई शेख सलमान शेख सद्दाम शेख सलीम इरफान शेख सतीश बारी आधी उपस्थित होते.
