लोणार प्रतिनिधी
अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळल्यास कडक कारवाई करणार :-तहसीलदार सैफन नदाफ
रात्रीच्या वेळेस अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर वर कारवाई करत दोन लाख 44 हजार रुपये दंड ठोठावला असून या कारवाईमुळे अवैद्य रेती वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे लोणार शहरातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या भरधाव वेगात विना पावती रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती लोणार तहसील चे तहसीलदार सैफन नदाफ व नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना मिळाली त्यांनी याबाबत सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना सतर्क करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या 3 एप्रिल 2021 रोजी रात्रीच्या वेळी मराठवाड्यातील रेती घाटातून रिसोड कडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच 30 ए व्ही 0394 हा अवैध रेती वाहतूक करताना लोणार लोणी रस्त्यावर मंडळ अधिकारी लक्ष्मणराव चोले व त्यांच्या सहकार्यास आढळून आला त्यांनी तात्काळ या टिप्पर ताब्यात घेत लोणार पोलीस स्टेशनला जमा केले
टिप्पर चालक सुशील ओमप्रकाश देशमुख राहणार रिसोड यांच्याकडे पावत्या बाबत विचारणा केली असता दोन ब्रास विना रॉयल्टी रेती वाहतूक करताना आढळून आला याबाबत सविस्तर पंचनामा करत पुढील अहवाल तहसीलदा सैपन नदाफ यांना देण्यात आला या टिप्पर वर कारवाई करत असताना त्याला दोन लाख 44 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे यापुढे रात्रीच्या वेळी विना पावती अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळल्यास कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिला आहे
