Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व आदेश निर्गमित करणार

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद दत्ता जाधव  

             औरंगाबाद-  राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या पूर्वी काढलेले आदेश या आदेशास सहपत्रित करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील या पुढील सर्व आदेश केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्गमित केले जातील व स्वतंत्रपणे कोणताही विभाग या बाबतचे कोणतेही आदेश काढणार नाही, असा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

                          औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. चव्हाण  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, पोलीस निरीक्षक बी.पी. कोळी उपस्थित होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडील आदेशामधील सर्व सूचना या पुरवणी आदेशासह संपूर्ण औरंगाबाद जिल्हयामध्ये लागू राहतील. यामध्ये लग्न समारंभ केवळ खाजगी जागांमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी यांची ना-हरकत (NOC) घेऊन, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्राम पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका) यांचेकडे परवानगीसाठी अर्ज सादर करावा व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिलेली परवानगी अंतिम राहिल. तसेच किमान (जास्तीत जास्त 50 लोक) उपस्थिती ठेवून विवाह नोंदणी कार्यालयात देखील नोंदविता येतील. उपस्थितांची यादी नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक यासह स्थानिक स्वराज्य प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक राहील. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. याचे नागरिकांनी काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील.

             शहरामध्ये संचारबंदी काळात नागरिकांचा विनाकारण संचार प्रतिबंधित, थांबविण्यास Covid-19 प्रतिबंध पथके गठीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन मनुष्यबळ उपलब्ध करुन देईल. सदर पथकास पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनाची असेल. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीशी संबंधित आस्थापना म्हणून सुरु ठेवता येईल परंतु या ठिकाणी कोविड-19 विषयक नियमांचे उल्लंघन दिसून आल्यास कोविड विषयक अधिसूचना लागू असे पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करणे भाग पडेल असा असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. शासकीय कार्यालयामध्ये अर्धन्यायीक कामकाज देखील ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व प्रकारची ऐतिहासिक स्थळे, वास्तू, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे बंद राहतील.

    अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि वाहतूक व्यवस्था यापूर्वीच सुरु ठेवण्यात आलेली आहे, ती सुरळीत सुरु राहण्यासाठी या क्षेत्राशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्व्हीस सेंटर आणि स्पेअर पार्ट विक्री आस्थापना सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहतील. तथापि वॉशिंग सेंटर, डेकोर, आणि तत्सम शॉप, केंद्र बंद असतील. सर्व प्रकारच्या ऑप्टीकल्स शॉप सुरु राहतील. चार्टर्ड अकाऊंटंट यांची कार्यालये सुरु राहतील, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

       कोविड-19 चा संसर्ग वाढू नये, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात शनिवार, रविवारी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. याबाबतचे आदेश वेळोवेळी काढण्यात आलेले आहेत. त्यांच्या सारानुसार (गोषवारा).



काय सुरु राहतील (Dos) काय बंद राहिल

1 वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा, D-Mart/Reliance/Big Bazar/More इ.(फक्त ग्रोसरी सेक्शन सुरु राहिल. ग्रोसरी सेक्शन वगळता इतर सर्व सेक्शन बंद राहतील).

 2 वृत्तत्र मिडीया संदर्भातील सेवा-आठवडयातील सर्व दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 यावेळेमध्ये करता येईल. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे

 3 दूध विक्री व पुरवठा इ हॉटेल्स, रेस्टॉरंट प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहिल मात्र घरपोच पार्सल सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 पर्यंत सुरु राहिल आणि कोणत्याही नागरिकास या सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही.

 4 भाजीपाला विक्री व पुरवठा सर्व खाजगी कार्यालये

5 फळे विक्री व पुरवठा  

6 जीवनावश्यक वस्तुंची दुकाने  

7 पेट्रोल पंप, गॅस एजन्सी इ.  

8 सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय)रिक्षासह इ.  

9 उद्योग व कारखाने  

 10 किराणा दुकाने : फक्त Stand Alone स्वरुपातील  

 11 चिकन, मटन, अंडी, मांस व मच्छी दुकाने

12 बँक व पोष्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरु ठेवण्यास मुभा राहिल.