औंढा नागनाथ/प्रतिनिधी
तालुक्यातील वडद येथे हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राज्याची धुरा सलग 29 वर्ष समर्थपणे सांभाळनारी पहिली स्त्री राज्यकर्ती. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पाहार काढुन ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या होळकरशाहीच्या पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त कोविड-19 च्या आदेशाचे पालन करून आज ग्रामपंचायत कार्यालय वडद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्याची जयंती साजरी करण्यात
आली त्यावेळेस उपस्थित ग्रामसेवक श्री.नागठाणे साहेब,सरपंच श्री.लक्ष्मण वाटोरे उपसरपंच श्री.रंगनाथराव भुमरे सदस्य श्री.निळकंठ नेव्हल, पांडुरंग भुमरे, अनंता इंगळे, गावचे चेअरमन रामराव भुमरे,ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सोपान नेव्हल व माणिका चौधरी तसेच जय मल्हार मित्रमंडळ मधील धिरज भुमरे,भागवत भुमरे ,बालाजी भुमरे, गोविंद भुमरे ,नवनाथ भुंमरे,बाबुराव भुमरे, दत्तराव भूमरे ,दीपक भुमरे ,साहेबराव भुमरे,निवृत्ती भुंमरे इत्यादी उपस्थित होते.
