Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

केमिकल कंपनीतील गाळ उठला 3 कामगारांच्या जीवावर. टाकी साफ करत असताना 3 कामगारांचा मृत्यू.

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

   जळगावातील एमआयडीसी मधील समृद्धी केमिकल कंपनीतल्या टॅंकमध्ये पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दुपारी घडलीय. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

    जळगावातील जुनी एमआयडीसी तील अ सेक्टरमधील समरुद्धी केमिकल कंपनीमध्ये आज दुपारी टाकी साफ करतांना तीन जणांचा मृत्यू झाला. यात रवींद्र गोटू झगडू कोळी (वय ३० रा. चिंचोली या. यावल) दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि मयूर विजय सोनार (35 रा. दिलीप किराणा कांचन नगर) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

   दरम्यान, दिलीप सोनार हे साफ सफाई साठी गटार मध्ये उतरले होते. यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने त्यांनी आरडा ओरड सुरू केली असता कंपनीत काम करणारा दुसरा हेल्पर  मयूर सोनार हे मदत करण्यासाठी आले असता त्यांचा देखील यावेळी तोल गेला आणि तेही गटारीत पडले. यावेळी मयूर यांनी देखील मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली असता एक गाडी जात असताना ड्रॉवर रवींद्र झगळु कोळी थांबला तोहि मदतीसाठी गेला असता त्याचा ही  तोल गटारीत गेला.  यावेळी कंपनीत काम करणारे दुसरे कर्मचारी यांनी त्यांना बाहेर काढले व जिल्हा रुग्णालयात आणले असता. वेधकीय अधिकारी डॉक्टर सचिन अहिरे यांनी तपासून मृत घोषित केले.  तिघांचे मृतदेह सिव्हील हॉस्पीटलमध्ये आणले आहेत.