पियुष ठोंबरे प्रतिनिधी चांदुर रेल्वे
अमरावती जिल्ह्यातील कवडा कडु सह चांदुर रेल्वे तालुक्यातील अनेक गावामध्ये सायंकाळी पाच वाजता झालेल्या वादळी वाऱ्या सह पावसामुळे चादुर रेल्वे तालुक्यातील कवठा कडु येथिल प्रकाश जिभकाटे.यांच्या घराजवळ असलेले गुलमोहरचे हे पुर्णता जमिनीतुन उपडुन घरावर पडले होते.
त्या लगतच असलेला विद्युत पुरवठेचा सिमेंट पोल हा सुद्धा पडला तेव्हा जिभकाटे परीवारांचे नशिब चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात जिवितहाणी टळली. तेव्हा त्यांचे घराचे नुकसान झाल्याने त्यांना शासणाकडुण आर्थिक मदत देण्याची मागणी. होत आहे.
