मो असलम परवेज प्रतिनिधी लोणार तालुका
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलडाणा, एस. रामामुर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये कोविड -19 च्या अनुषंगाने दिनांक 20 मे 2021 चे सकाळी 6.00 वाजेपासुन ते दिनांक 1 जुन 2021 चे सकाळी 7.00 वाजेपावेतो नवीन निर्बंधासह प्रतिबंधात्मक आदेश दिनांक 19 मे 2021 रोजी पारीत केले आहे.
निर्बंधासह सुट देण्यात आलेल्या सेवा
सदर आदेशानुसार सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने किराणा स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 सुरू राहील. भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 पर्यंत सुरू ठेवण्यात येतील. एकाच ठिकाणी भाजीमंडी न लावता वेगवेगळ्या ठिकाणी, खुल्या मैदानात चुन्याने मार्कीग करुन 2 मीटर अंतरावर दुकाने लावण्याची कार्यवाही शहरी भागात संबंधीत मुख्याधिकारी नगर परिषद नगर पंचायत व ग्रामीण भागात संबधीत गटविकास अधिकारी यांनी करावी.
दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 6.00 ते सकाळी 9.00 (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी (घरपोच दुध संध्याकाळी 6.00 ते रात्री 9.00 सर्व प्रकारच्या खादयाची दुकाने (अंडी चिकन, मांस, मासे, स्वीटमार्ट) सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 दुकाने, कृषी प्रक्रीया, उदयोग गृहे/ शेती याबाबतचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबधीत कृषी सेवक, तालुकातालुका कृषी अधिकारी यांची राहील. तसेच जिल्हयात सदर प्रक्रीयेचे नियंत्रण व नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांची राहील. तसेच सदर ठिकाणी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, सॅनिटायजर इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
. सर्व राष्ट्रीयकृत बँका/ खाजगी बँका सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 नागरीकांसाठी सुरु राहतील तसेच त्यांचे विमा, पोस्ट पेमेंट बँक व आर्थीक व कार्यालयीन कामकाज नियमित वेळेनुसार सुरु राहील. CSP चे कामकाज ग्रामपातळीवर 24 x 7 सुरु राहील तसेच ATM मध्ये 24 x 7 रोख रक्कम उपलब्ध ठेवणे बाबत संबंधीत बँकानी नियोजन करावे. खरीप हंगामास सुरुवात होत असल्यामुळे शेतक-यांची पिक कर्जाची कामे प्राधान्याने करावीत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 सुरू राहील. पावसाळी हंगाम सामग्री संबधीत दुकाने सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 व पेट्रोलपंप/ डिझेलपंप/ सीएनजी गॅस पंप सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 सुरू राहील, सकाळी 11.00 ते रात्री 8.00 या कालावधीत शासकीय मालवाहतुक, अॅम्ब्युलन्स इत्यादी अत्यावश्यक वाहनांकरीता वाहनांकरीता तसेच शेतक-यांना त्यांच्या शेतातील कामे व मालाची वाहतुक करण्याकरीता शहानिशा करुन ट्रॅक्टर घेऊन येणा-या शेतक-यांना डिझेल इंधन पुरवठा करता येईल. M.I.D.C. व राष्ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोलपंप/ डिझेलपंप नियमित वेळेनुसार सुरू राहील. बॅटरी, इनव्हर्टर, युपीएस इ. साहित्याची आवश्यकता भासल्यास रुग्णालये, कोविड हॉसपीटल, I.C.U., क्रिटीकल सेंटर इत्यादी अत्यावश्यक ठिकाणी सामग्री व तद्नुषांगीक साहीत्य उपलब्ध करुन देण्यासाठी उघडता येतील. (इतर कोणत्याही परिस्थीतीत संबधीत दुकानदार, विक्रेते यांना दुकान उघडुन मालाची विक्री करता येणार नाही. मद्य विक्री सकाळी 7.00 ते रात्री 8.00 (फक्त घरपोच सेवा) कोणत्याही परिस्थीतीत मद्य विक्रीची दुकाने उघडुन करता येणार नाही. रेस्टॉरंट, भोजनालये, उपहार गृहे सकाळी 7.00 ते रात्री 8.00 फक्त होम डिलीव्हरी सेवा पुरविण्यास परवानगी राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता,1800 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 61 से 80 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशन पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात आले आहे. सदर आदेश दिनांक 20/05/2021 चे सकाळी 6.00 वाजेपासुन ते दिनांक 01/06/2021 में सकाळी 7.00 वाजेपर्यत लागु राहील.
