Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लॉक डाऊन काळात खाजगी फायनान्स कडून सक्तीची वसुली

Responsive Ad Here

  दत्तात्रय शेळके प्रतिनिधी बोरगाव

        भारत फायनान्स शाखा तालुका परतुर हैदराबाद मध्ये महिला बचत गटाची सक्तीने वसुली  भारत फायनान्स पोस्ट हैदराबाद कडून महिला बचत गटावर बोरगाव वैद्य वडगाव आंभोरातसेच जयपुर इतर खेडेगावात महिला बचत गटावर कर्ज वाटप झालेले असून सध्या लोक डाऊन मध्ये बचत गटाची अधिकारी महिला कडून सक्तीने सक्तीने वसुली करत आहेत सदर गटाची अधिकारी गावात येऊन महिला गटाला दमदाटी करत सदर महिलांचेनावे ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे धमक्या देत आहेत.

     विचार न केल्यास आम्ही महिलांना कर्ज दिले आहे वसुली महिला कडूनच करू अशा प्रकारची भाषा वापरतात  गटाची वसूली करणारे अधिकार्‍याकडे प्रवासी पास तसेच कोरोना सर्टिफिकेट सुद्धा उपलब्ध नाहीत हे लोक या गावातून त्या गावात असा सतत प्रवास करत असतात .अधिकाऱ्याकडून गावातील महिलांना करुणा ची लागण होण्याची दाट शक्यता आहे ब्रांच मॅनेजर तसेच एरिया मॅनेजर या लोकांना विचारपूस केली असता गटाचे वाटत वाटप चालू आहे व वसुली चालू आहेअसे सांगतात.

    परंतु सदर गटाची फक्त वसुलीत सुरू आहे या गटाचे नवीन वाटप सध्या बंद असून   कोरोना लोक डाऊन मध्ये सुद्धा सावकार की प्रमाणे कडक वसुली सुरू आहे. सदर गटाचा पैसा हा गोरगरिबांना परवडणारा नसून हा पैसा चक्रवाढ व्याजाने दिला जातो. शासनाने सदर फायनान्स ची चौकशी करून खेड्यापाड्यातील गोर गरीब लोकांची होणारी लूट थांबवावी व सदर फायनान्स वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

चार चौघात अपमानित करून गुंडगिरीने पैसे काढण्यासाठी ठेवलेल्या रिकवरी एजंट च्या माध्यमातून होणारी ही वसुली सावकारी पेक्षाही भयंकर असून त्यांच्यावर सावकारी कायदा सारखे कडक कायदे करून कारवाई करायला हवी

 जिल्ह्यावर फायनान्स कंपन्या विविध स्किम व प्रलोभने देऊन महिलांना फायनान्स च्या जाळ्यात ओढतात एका कंपनीची कर्ज असतानाही दुसरी कंपनी तिसरी कंपनी कर्ज देतात आणि मग कर्जाच्या वसुलीसाठी सावकार पेक्षाही अधिक त्रस्त करू नये .बँकिंग फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता बँकिंग ,फायनान्स , विमा किंवा इतर आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता जसे आय आर डी ए , आय आय बी एफ, बँकिंग पी आर ओ, एम बी ए बँकिंग किंवा फायनान्स, इत्यादी पैकी कोणतीही पात्रता नसते.

              कोरोना आणि खाजगी फायनान्स कंपन्या

कधी नव्हे ते घडले कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग ठप्प झाले संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरू झाले व सर्व जनता आपल्या घरामध्ये कैद झाली उद्योगधंदे बंद झाले. खाण्यापिण्याचे वांदे झाले घरातून बाहेर पडण्याची ही मुभा नसताना कामाला जाणार कसे व फायनान्स हप्ते भरणार कसे ही समस्या भेडसावत होती. रिझर्व बँकेने कोरोना लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर सहा महिने कर्जाचे हप्ते वसुलीसाठी शिथिलता दिली परंतु या काळातही मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे फायनान्स चे अधिकारी व कर्मचारी आपल्या वाहनाद्वारे या भागातून त्या भागात फिरून पैसे गोळा करत महिलांना धमकावत होते. कोणतीही आरोग्य तपासणी नसताना वाहनांची पास नसताना आपल्या खाजगी वाहनांद्वारे फिरून वसुली करत होते एका वेळेला 20 ते 30 बचत गट बचत गटांमधील हजारो महिलेच्या संपर्कात येऊन पैसे गोळा करत व त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असतानासुद्धा लोकांच्या जीवांची फायनान्स कंपनी खेळ केला.