Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खत दरवाढी विरोधात स्वाभिमानीआक्रमक

Responsive Ad Here

अंबड तालुका प्रतिनिधी भिमराव हारे

         स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे (ता.२०) गुरुवार रोजी केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढीविरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

          केंद्र सरकारने नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे.नव्या दरामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून लॉकडाऊन लावले आहे.मार्केट कमिट्या बंद ठेवल्या आहेत.याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे

   त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण पूर्णपणे कोलमडणार आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भरमसाठ खत दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची "एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर तिर्व आंदोलन करण्यात येणार आहे.

          स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन होणार आहे.ह्या आंदोलनामध्ये अंबड तालुक्यातील वडिगोद्री परिसरातील शेतकरी आपापल्या शेतात रिकाम्या खतांच्या बॅगा जाळून या आंदोलनात सहभागी होणार आहेत,असे निवेदन गोंदी पोलीस ठाणे येथील पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना देण्यात आले आहे.