वडीगोद्री प्रतिनिधी भीमराव हारे
शासन कोरोनाच्या नावाखाली समाजाचे प्रश्न दडपून टाकण्याच्या तयारीत आहे.या सरकारने मराठा आरक्षणाचा जाणिवपूर्वक खेळखंडोबा केला आणि आता मराठा समाजाला नादी लावण्यासाठी बैठकांचे गुऱ्हाळ सुरू केले आहे.राज्यपालांकडे चाललोत व राष्ट्रपतीकडे जाणार हि नुसती बेगडी पळापळ सरकारने सुरू केली आहे.म्हणून मराठा समाजाने आता लढण्यासच सज्ज व्हावे.यातच समाजाचे हित आहे,असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील तरुणांना केले आहे.
जर या मागण्या मान्य करायच्या असतील तर मराठा समाजाने लढा उभा करावा.मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा.कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.एसईबीसीमधून विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात.मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शासकीय नोकरीत देण्यात यावी.कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या फिस परत करण्यात याव्यात.
या मागण्या आज आणि उद्याच्या होणार्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात याव्यात आणि सरकारने जर हे मान्य नाही केले तर मराठ्यांनी लढण्यास सज्ज व्हावे,असे आवाहन मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.
